breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मोठी बातमी! राष्ट्रपतींकडून न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली – भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. पदभार स्विकारताच एन. व्ही. रामन्ना हे देशाचे ४८ वे सरन्यायाधीश ठरणार आहे.

देशाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीच पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या शिफारसीनंतर राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यालयाकडून आता नियुक्त करण्यात येत असल्याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे हे येत्या 23 एप्रिलला निवृत्त होणार असून त्यांनी पुढच्या सरन्यायाधीश पदासाठी न्यायाधीश एन व्ही रामन्ना यांचं नाव सुचवलं होतं. एन. व्ही. रामन्ना यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 साली आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला.

एन. व्ही. रामन्ना हे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश म्हणून 26 ऑगस्ट 2022 पर्यंत काम पाहणार आहेत. जवळपास चार दशकांच्या न्यायव्यवस्थेच्या कार्यकाळात एन. व्ही. रामन्ना यांनी आंध्र प्रदेश, केंद्र आणि आंध्र प्रदेश प्रशासकीय न्यायाधिकरण उच्च न्यायालयाबरोबर इतरही महत्त्वाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी बजावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button