breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात नॉन कोविड रुग्णांकरिता स्वतंत्र यंत्रणा उभारावी: धनंजय पोटदुखे

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मनपा चे कोरोना व्यतिरिक्त रुग्णासाठी बेड किंबहुना स्वतंत्र यंत्रणा (रुग्णालय)उभारण्यात यावी अशी मागणी धनंजय पोटदुखे यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांत कोरोना व्यतिरिक्त रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून द्यावेत किंवा त्या रुग्णांना संसर्ग होऊ नये म्हणून एक वेगळी यंत्रणा / रुग्णालय उभारण्यात यावे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारची मागणी विद्यमान नगरसेविका सौ. मंगलाताई कदम यांनी केली होती आणि ती योग्य आहे, त्याच मागणीला अनुसरून ही मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना व्यतिरिक्त रुग्णांचे शहरात हाल होत असून सर्वसामान्य व्यक्तींना अशा परिस्थितीत खाजगी रुग्णालयात उपचार न परवडणारे आहेत. त्यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगत आपल्या घरी देखील १५ दिवसांपूर्वी माझ्या वडिलांना निमोनिया ची लक्षणं दिसल्यामुळे त्यांना प्रथम कोरोनाची चाचणी करायला सांगितली म्हणून आम्ही भोसरी रुग्णालयात पोहोचलो तिथे त्यांची अँटीजन रॅपिड टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. आता पेशंट नॉन- कोविड असल्यामुळे त्यांना कुठल्याच सरकारी हॉस्पिटल मध्ये घेतले नाही. तसेच खाजगी चे दर २०००० ते ६०००० रुपये डिपाॅझिट भरून दिवसाचे ४००० ते १०००० केवळ जनरल चे दर आहेत आणि इतर औषधे आणि चाचण्या त्यांचा खर्च तो वेगळा.

अशा परिस्थितीत सर्व सामन्यांना खाजगी रुग्णालय परवडणारी आहेत का? सरकारी योजना असल्या तरी त्या किती लोकांपर्यंत पोहोचत आहेत? असे सवाल देखील त्यांनी उपस्थित केले आहेत.

आज कोरोनाचं भूत येवढं मोठं झालंय की त्याच्या नादात इतर वेळेस ज्या वेगवेगळ्या आजारांनी अथवा अपघातग्रस्तांनी रुग्णालयं खच्च भरायची आज हे सर्वजण अचानक गायब झाले का? अनेक रुग्ण या कोरोनाच्या भीतीमुळे आणि आर्थिक चणचणीमुळे आपले आजार अंगावर काढत असल्याचं वास्तव्य त्यांनी मांडले आहे.

आज माझ्या कुटुंबाला जो त्रास सहन करावा लागला तो इतर कोणाच्या वाट्याला येऊ नयेत तसेच त्यांना योग्य ते उपचार मिळावेत एवढीच माफक अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एकीकडे शहरातील परिस्थिती कोरोना मुळे जेवढी भयानक आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सर्वजण पाहत आहोत परंतु तेवढीच दुसरीकडे नॉन-कोविड रुग्णांची स्थितीही भयावह असल्याचं  देखील त्यांनी यावेळी म्हटले तेव्हा त्यांचा देखील विचार व्हावा आणि शक्य असल्यास  वाय.सी. एम. अथवा मनपाचे इतर रुग्णालयांपैकी कोणतेही एक रुग्णालय हे नॉन – कोविड मध्ये रुपांतरीत करावे अथवा यांना बेड उपलब्ध करून द्यावेत अथवा एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी त्यांनी आयुक श्रावण हर्डीकर तथा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button