breaking-newsआंतरराष्टीय

एका उदयोगपतीसाठी सरकारने राफेल व्यवहाराचा करार बदलला- राहुल गांधी

लंडन- येथे काँग्रेस आज अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर तोषारे ओढले. ते म्हणाले की, बीजेपी सरकारने त्यांच्या जवळच्या व्यावसायिकांना लाभ व्हावा म्हणून राफेल विमान खरेदी व्यवहारात काही बदल केले आहेत.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे राहुल गांधी यांनी नॅशनल इंडियन स्टुडन्ट आणि आलूमनी यूनियन (युके) यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपली काही मते मांडली. त्यात त्यांनी राफेल व्ययवहारात भ्रष्टाचार झाला असल्याचे बोलले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकाही निकटवर्तीय उद्योजकांना विमान बांधणीमध्ये काही अनुभव नसताना मदत केली असा आरोप केला.

राहुल गांधी हे बाजीपी सरकारने खूप मोठी रक्कम देत राफेल करार केल्याने सरकारला धारेवर धरत आहेत. हिंदुस्थान अँरोनॉटिक्स लिमिटेड मागील ७० वर्षांपासून विमान बांधणीचे कार्य करते आहे त्यांना त्यात पुरेसा अनुभव आहे.त्यामुळे हा करार त्यांना मिळणार होता. १२६ विमानासाठी या कराराची रक्कम ५२० कोटी असणार होती. परंतु मोदी यांनी फ्रान्सचा दौरा करून आल्यानंतर हा करार अनिल अंबानी यांना दिला. त्यातही फक्त ३६ विमानांसाठी १६०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button