TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्र

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : रिदमिक योगासनातील ‘कांस्य’ पदकाद्वारे महाराष्ट्राच्या पदक संपादनाचा ‘‘श्रीगणेशा’’

नागपूरकर कुश इंगोले व यज्ञेश वानखेडे यांनी मिळविले पहिले कांस्यपदक

चेन्नई : कुश इंगोले व यज्ञेश वानखेडे यांनी मिळविलेल्या रिदमिक योगासनातील कांस्यपदकाद्वारे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदकाची बोहनी झाली. अमित कोन्व्हेंट स्कूल, नागपूर येथे शिकणाऱ्या कुश व यज्ञेश या अकरा वर्षाच्या खेळाडूंनी येथील स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला होता, तरी देखील त्यांनी कोणतेही दडपण न घेता अतिशय सुरेख रचना सादर केल्या आणि कांस्यपदकाला गवसणी घातली. हे दोन्ही खेळाडू नागपूर येथे संदेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. त्यांनी याआधी कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतही कांस्यपदक पटकाविले होते. तसेच त्यांनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेतही या क्रीडा प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती.

 

हेही वाचा – खासदार श्रीरंग बारणे यांची मोरया गोसावी मंदिरात स्वच्छता मोहीम

पदक मिळवण्याची खात्री होती असे सांगत कुश आणि यज्ञेश म्हणाले,” आता कुठे आमच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आहे आम्हाला अजूनही भरपूर यश मिळवायचे आहे. त्यामुळेच येथील कांस्य पदक आमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे.‌ आता आम्ही अधिक जोमाने सराव करणार आहोत.

येथील स्पर्धेत महाराष्ट्राचे अकरा मुले व नऊ मुली असे एकूण वीस खेळाडू सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राला गतवेळी देखील खेलो इंडिया व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत योगासनामध्ये भरपूर पदके मिळाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button