breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

भारत आणि कॅनडातील तणाव आणखी वाढला; कॅनडातील लोकांना भारतात येण्यावर बंदी

Indians in Canada : खलिस्तानी चळवळीचा समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणावरून भारत व कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. कॅनडानं भारताता या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. दरम्यान, आता भारतानं एक मोठा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारने कॅनडातील भारताची व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली असून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा स्थगित असेल, असं कॅनडातील व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे. भारतातून कॅनडामध्ये जाणाऱ्या व कॅनडातून भारतात येणाऱ्या असंख्य भारतीय व कॅनेडियन नागरिकांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Video : लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या भक्तांमध्ये चेंगराचेंगरी, भाविक जखमी

नेमकं प्रकरण काय?

जून महिन्यात हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात आल्यानंतर त्यावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. भारताच्या कॅनडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टीही केली. यावर भारतानंही हे आरोप फेटाळताना कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना विशेष सूचना जारी केल्या. या पार्श्वभूमीवर भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button