Video : लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेल्या भक्तांमध्ये चेंगराचेंगरी, भाविक जखमी
मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनाला दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करत आहेत. लालबागच्या राजाच्या दरबारातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामध्ये भक्तांची प्रचंड चेंगराचेंगरी झाली आहे.
हेही वाचा – गौरी आणि गणपतीचे नाते काय? जाणून घ्या उत्तर
#Mumbai stampede like situation witnessed on Day 2 of Ganpati darshan at Mumbai's famous #LalbaugchaRaja people can be seen pushing just to get out of the chaotic stampede like situation some fall on the ground#LalbaugchaRaja #Ganpati2023#stampede pic.twitter.com/J3SnyeXfJP
— Vinay Tiwari (@vinaytiwari9697) September 21, 2023
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचा आशिर्वाद घेण्यासाठी मोठा जमाव जमला होता. यावेळी मोठ्या प्रमाणत धक्काबुक्की झाली.ज्यामध्ये गर्दी, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी दिसून येत आहे. यामध्ये महिला आणि लहान मुले देखील गर्दीत चिरडताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो. विशेष म्हणजे, यामध्ये गर्दी, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी दिसून येत आहे.