breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

धक्कादायक! महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई : पावसाअभावी राज्यातल्या अनेक भागांमधील पिकांचं नुकसान झालं आहे. यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात तब्बल १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांची विभागनिहाय आकडेवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये म्हटलं की, राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलैपर्यंत तब्बल १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अमरावतील विभागात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या विभागात गेल्या ७ महिन्यांमध्ये तब्बल ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

अमरावती विभागात ६३७ शेतकरी आत्महत्या

अमरवती १८३
बुलढाणा १७३
यवतमाळ १४९
अकोला ९४
वाशीम ३८

औरंगाबाद विभागात ५८४ शेतकरी आत्महत्या

बीड १५५
उस्मानाबाद १०२
नांदेड ९९
औरंगाबाद ८६
परभणी ५१
जालना ३६
लातूर ३५
हिंगोली २०

हेही वाचा – भारत आणि कॅनडातील तणाव आणखी वाढला; कॅनडातील लोकांना भारतात येण्यावर बंदी 

नागपूर विभागात १४४ शेतकरी आत्महत्या

चंद्रपूर ७३
वर्धा ५०
नागपूर १३
भंडारा ०५
गोंदिया ०३

नाशिक विभागात १७४ शेतकरी आत्महत्या

जळगाव ९३
अहमदनगर ४३
धुळे २८
नाशिक ०७
नंदुरबार ०३

पुणे विभागात १६ शेतकरी आत्महत्या

सोलापूर १३
सातारा ०२
सांगली ०१

(पुणे आणि कोल्हापूर शून्य शेतकरी आत्महत्या)
कोकण विभागात शेतकरी आत्महत्या नाही

सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात

  • जानेवारी २२६
  • फेब्रुवारी १९२
  • मार्च २२६
  • एप्रिल २२५
  • मे २२४
  • जून २३३
  • जुलै २२९
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button