breaking-newsपिंपरी / चिंचवड

शहरातील प्रमुख 17 रस्ते राहणार बंद

पिंपरी ( महा ई न्यूज ) – यंदाही पुण्यात गणेश विसर्जनादिवशी मिरवणूक पाहायला येणा-या नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा आहे. येत्या रविवारी (दि.23) शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यावर्षी देखील वर्तुळाकार मार्गाची आखणी करण्यात आली आहे.

शहरातील लक्ष्मी रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, गुरूनानक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन रोड, भांडारकर रोड, पुणे- सातारा रोड, सोलापूर रोड, प्रभातरोड हे प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीचा समारोप होईपर्यंत हे रस्ते बंद राहतील.

गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मंडईतील टिळक पुतळा येथून होणार आहे. पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका केवळ यांसारख्या वाहनांसाठी वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे. तसेच सोमवारी दुपारनंतर शहरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button