ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्मार्ट सिटीतील रिक्षाचालक ही स्मार्ट झाले पाहिजे – पोलीस आयुक्त

पिंपरी चिंचवड | ‘पिंपरी चिंचवड, पुणे शहर हे स्मार्ट सिटी शहर म्हणून पुढे येत आहेत. शहरात येणाऱ्या नागरिकांना रिक्षा चालक अगोदर भेटतात रिक्षाचालकांच्या वागण्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था कशी आहे हे दिसून येते. पिंपरी-चिंचवड शहरात मीटर सक्ती कार्यक्रम राबवला. नागरिकांना उत्तम प्रवासी सेवा मिळावी, यासाठी स्मार्ट सिटीतील रिक्षाचालक ही स्मार्ट झाले पाहिजे असे,’ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.

क्रांती दिनाच्या निमित्ताने चाकण येथे (दि.09) वाहतूक विभाग आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड यांच्या आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त बोलत होते. यावेळी कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते रिक्षाचालकांना रिक्षा ड्रेस, पी पी किट वाटप, व कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले, चाकण पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, माजी उपसरपंच मनोज खांडेभराड, रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे, चक्रेश्वर रिक्षा स्टँडचे अध्यक्ष कैलास नाना वलांडे आदी उपस्थित होते.

कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘पोलीस आणि रिक्षा चालकांमध्ये साम्य आहे आम्हालाही खाकी ड्रेस आहे तुम्हाला पण आहे आम्हाला बक्कल नंबर आहे तुम्हाला बॅच नंबर आहे, पोलीस दिवसभर रस्त्यावर असतो तुम्ही पण रस्त्यावर असतात, फक्त आम्हाला कायदा-सुव्यवस्थाचे जास्त अधिकार आहेत, परंतु तुम्हाला नागरिकांची सेवा करण्याची अधिक संधी आहे, कोरोनामध्ये ॲम्बुलन्स कमी पडत होते, यावेळी रिक्षाचालकांनी रिक्षाला ॲम्बुलन्स बनवून नागरिकांना सेवा दिली आहे. कोविड योद्धा म्हणून तुमचा सन्मान करताना आनंद होत आहे, फायनान्स कंपनीच्या वतीने चुकीच्या पद्धतीने वसुली बाबत लवकरच फायनान्स कंपनी सोबत बैठक घेऊन मार्ग काढू.’

‘नियम न पाळल्यास इतरांना शिस्त नियम बाबत आपण अधिकार वानीने बोलू शकत नाही, सर्वांनी वाहतुकीचे नियम व शिस्त पाळावी’, असे आवाहन देखील कृष्ण प्रकाश यांनी रिक्षाचालकांना केले,

यावेळी कोविड योध्दा म्हणून लक्ष्मन शेलार, जाफर शेख, सुरज सोनवणे, रविंद्र लंके, अनिल शिरसाठ, अजय साळवे, तुषार लोंढे, संजय दौंडकर, सिध्देश्वर सोनवणे, अविनाश जोगदंड, प्रदिप अय्यर, गजानंन लोनारी, माऊली शिंदे, किरण मुंगसे, भानुदास गांडेकर , अतिष भुजबळ, किरण खांडेभराड, दिपक कुसाळकर ,मनिष दौंडकर, लक्ष्मण गांडेकर, संतोष मस्के, शंकर जोगदंड, अक्षय वलांडे, बाळासाहेब बागडे, यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी किरण खांडेभराड, राजाभाऊ शिंदे, पोपट खांडेभराड, दिपक कुसाळकर, मनिष दौंडकर यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button