breaking-newsताज्या घडामोडीराजकारणविदर्भ

विजेचे २०० युनिट मोफत देण्याची घोषणा पूर्ण न करणाऱ्या आमदाराचा निषेध

  • २०० युनिट मोफत मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील – देवराव भोंगळे

चंद्रपूर |

२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी घोषणापत्रात चंद्रपुरातील जनतेला दर महिन्याला विजेचे २०० युनिट मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. पावणेदोन वर्षांनंतर सुद्धा सरकारला समर्थन देणाऱ्या या आमदारांनी आश्वासन पूर्ण करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही व जनतेची फसवणूक केली आहे. अशा आमदाराला आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे यांनी केले.

भाजपच्या वतीने सोमवारी गांधी चौकात आमदार जोरगेवार यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली व आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी न घाबरता स्वत:ला अटक करून घेतली. आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला दर महिन्याला २०० युनिट मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार आल्यापासून चंद्रपूरचे आमदार सरकारचे समर्थक म्हणून ओळखले जातात. अशावेळेला इतक्या प्रचंड बहुमतात असलेल्या सरकारकडून २०० युनिट मोफत देण्याचे आश्वासन पूर्ण न करता जनतेशी विश्वासघात करीत आहेत.

अशा आमदारांना आपल्या पदावर क्षणभरही राहण्याचा अधिकार नाही व त्यांनी ताबडतोब आमदारकीचा राजीनामा द्यावा, असेही भोंगळे म्हणाले. याप्रसंगी आमदाराच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी झाली. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे, ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, महासचिव ब्रिजभूषण पाझारे यांनी सुद्धा यथोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती रवि आसवानी, भाजप नेते प्रमोद कडू, महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजप महानगर महिला जिल्हाध्यक्षा अंजली घोटेकर, रवींद्र गुरनुले, सुभाष कासनगोट्टूवार, राहुल घोटेकर, झोन सभापती छबू वैरागडे, शीला चव्हाण, आशा आबोजवार यांची उपस्थिती होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button