Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माऊली पंढरपूरला चला! आषाढी एकादशीला वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर

परभणी : आषाढी एकादशीसाठी प्रत्येक भाविक आतूरतेने वाट बघत असतो. यंदा करोनाचं सावट नसल्याने पायी वारीलाही मोठा जनसागर लोटला आहे. अशात आता वाकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे मंत्रालयाने विठ्ठल दर्शनासाठी जालना, औरंगाबाद, नांदेड रेल्वे स्थानकावरुन तीन यात्रा स्पेशल विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

यात्रा महोत्सव दरम्यान रेल्वेने जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर ये-जा करण्यासाठी ९ जुलै पासून ही सेवा सुरू केली आहे. गाडी क्रमांक ०७४६८ जालना पंढरपूर- जालना विशेष रेल्वे जालना स्थानकावरून ९ जुलै रोजी सायंकाळी ७:२० वाजता सुटून परभणी, परळी वैजनाथ, लातुररोड मार्गे पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने ही गाडी गाडी १० जुलै, २०२२ रोजी रात्री ८:३० वाजता पंढरपूर स्थानकावरून सुटेल आणी सकाळी १० वाजता जालन्याला पोहोचेल.

या गाडीत वातानुकुलीत, द्वितीय शय्या (स्लीपर), जनरल असे १३ डब्बे असतील. गाडी क्र ०७५१५ औरंगाबाद -पंढरपूर- औरंगाबाद ९ जुलै रोजी औरंगाबाद स्टेशनवरून रात्री ९ : ४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११: ३० वाजता परभणी,परळी वैजनाथ, लातुररोड मार्गे पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी पंढरपूर स्टेशनवरून १० जुलै रोजी रात्री ११ वाजता निघूल दुसऱ्या दिवशी १२:२० वाजता औरंगाबादला पोहोचेल.

१७ डब्यांच्या या गाडीला द्वितीय शय्या (स्लीपर), जनरल असे डबे असणार आहेत. गाडी संख्या ०७४९८ नांदेड -पंढरपूर-नांदेड विशेष रेल्वे नांदेड स्थानकावरून ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुटेल, दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३५ वाजता पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातुररोड मार्गे पंढरपूरला पोहोचेल.

परतीच्या गाड्या…

परतीच्या दिशेने गाडी पंढरपूर स्टेशनवरून १० जुलै रोजी रात्री ९:३० वाजता निघून आणि दुसऱ्या दिवशी सायं ६:५० वाजता नांदेडला पोहोचेल. या गाडीत वातानुकुलीत, द्वितीय शय्या ( स्लीपर), जनरल असे १८ डब्बे असतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button