TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

मेधा पाटकर या शहरी नक्षलवादी; गुजरातच्या भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका

अहमदाबाद : गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी बुधवारी सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांचा उल्लेख ‘शहरी नक्षलवादी’ असा केल्याने वाद निर्माण झाला आहे. मेधा पाटकर या कट्टर गुजरातविरोधी व्यक्ती असून गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष मेधा पाटकर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून वापर करणार आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

आम आदमी पक्षाने पाटकर यांना २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. हाच धागा पकडून पाटील म्हणाले. ‘‘आम आदमी पक्षाने अशा एका व्यक्तीला लोकसभेचे तिकीट दिले, जिने कच्छ आणि सौराष्ट्र या प्रदेशातील नागरिकांना नर्मदेच्या पाण्यापासून सुमारे १५ वर्षे वंचित ठेवण्याचे पाप केले,’’

पाटकर यांनी एका कार्यक्रमात असे सांगितले होते की, सरदार सरोवर धरण कधीच पूर्ण होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेणार आहे. हा प्रकल्प रखडवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. जेव्हा धरण पूर्ण झाले, त्या वेळी त्यांनी कच्छ आणि सौराष्ट्र या भागांत पाणी पोहोचण्यापासून रोखण्याची शपथ घेतली होती, असा आरोप पाटील यांनी केला.

दरम्यान, आम आदमी पक्षाने मात्र पाटील यांच्या आरोपाचे खंडन केले असून गुजरातमधील सत्ताधारी भाजप हा पक्ष अफवा पसरवत असल्याचा आरोप केला.

गेल्या आठवडय़ात गुजरातच्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा उल्लेख ‘शहरी नक्षलवादी’ असा केला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button