breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑस्ट्रोलिया संघाला मोठा धक्का! दिग्गज खेळाडूची निवृत्तीची घोषणा

ऑस्ट्रोलिया टी-२० संघाचा कर्णधार आरोन फिंचची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Aaron Finch : भारत विरूद्ध ऑस्ट्रोलिया यांच्यातील मालिका सुरू होणार आहे. पण त्यापुर्वी ऑस्ट्रोलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रोलिया टी-२० संघाचा कर्णधार आरोन फिंच याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली होती. गतवर्षी सप्टेंबरमध्ये त्याने वनडेतून निवृत्तीची घोषणा केली होती.

सध्या ऑस्ट्रेलियन संघ हा बॉर्डर गावसकर मालिकेसाठी भारतात आलेला आहे. त्यादरम्यान फिंचने निवृत्तीची घोषणा केल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला धक्का बसला आहे. मात्र फिंचचा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघामध्ये समावेश नव्हता.

मी २०२४ च्या पुढील टी-२० विश्वचशकापर्यंत खेळणार नाही, हे लक्षात घेऊन, पद सोडण्याची आणि त्या स्पर्धेसाठी संघाला वेळ देण्याची हीच योग्य वेळ आहे. माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्या चाहत्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांचेही मी खूप आभार मानू इच्छितो, असं फिंचने म्हटलं आहे.

२०२१ मध्ये दुबई येथे फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रोलियाने त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने वनडे कर्णधारपदाची निवृत्ती जाहीर केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button