breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

काँग्रेस नेते बाळासाहेब थारोतांचा राजीनामा?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे दिला राजीनामा

मुंबई : नाशिक पदवीधर उमेदवारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी बोलून दाखवली. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पावठून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य आसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर पक्षासह राजकीय वर्तुळात चर्चाना उधान आले आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी, असं काही झालेलं नाही. बाकी राहिला विषय बाळासाहेब थोरत यांच्या राजीनाम्याचा, तर त्यांनी राजीनामा दिलेला नाही, असं म्हटलं आहे.

कार्यकारणीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यायची असते. असं असताना काही लोक तर वर्ष वर्ष घेत नव्हते. मात्र, आमची मागील महिन्यातच नागपूरमध्ये प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली होती. आता पुन्हा १५ फेब्रुवारीला अशीच बैठक होणार आहे. त्यात या पोटनिवडणुकींची रणनिती बनवणं, आत्ताच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात विजयी आमदारांचा सत्कार आणि राहुल गांधीबरोबर कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असं चाललेल्या यात्री यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असही नाना पटोले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button