breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

सर्वसामान्यांना फटका; पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच

मुंबई – सर्वसामान्यांचे बजेट अतिशय कोलमडलेले असतानाच पेट्रोल-डिझेलची महागाई थांबण्याचे नाव घेत नाहीये. अनेक ठिकाणच्या नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी शंभरहून अधिक रुपये मोजावे लागत आहेत, तर डिझेलही लवकरच शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमती 26 वरून 29 पैशांनी वाढल्या आहेत तर डिझेलची किंमत 30 पैशांनी वाढली आहे. मुंबईत आज पेट्रोल 103.36 रुपये तर डिझेल 95.44 रुपये प्रति लिटर पोहोचलं आहे. शनिवारी देशभरातील तेलाचे दर स्थिर होते.

दरम्यान, 1 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 27 वेळा वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 6.83 रुपयांची वाढ झाली. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 7.24 रुपयांनी वाढ झाली आहे.

राज्यातील पेट्रोल, डिझेलचे दर
मुंबई – पेट्रोल : 103. 36 प्रतिलिटर, डिझेल : 95. 44 प्रतिलिटर

परभणी – पेट्रोल : 105,70 प्रतिलिटर, डिझेल : 96.22 प्रतिलिटर

औरंगाबाद – पेट्रोल : 104. 44 प्रतिलिटर, डिझेल : 94.63 प्रतिलिटर

नागपूर – पेट्रोल : 103.21 प्रतिलिटर, डिझेल : 93.86 प्रतिलिटर

अमरावती – पेट्रोल : 104.81 प्रतिलिटर, डिझेल : 96.92 प्रतिलिटर

पुणे – पेट्रोल : 103.02 प्रतिलिटर, डिझेल : 93.63 प्रतिलिटर

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button