breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘माल’ म्हणजे ‘ड्रग्ज’ नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल: उज्ज्वल निकम

मुंबई | व्हॉट्सअॅप चॅटवरून ‘माल है क्या’ असं विचारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला ‘माल’ म्हणजे ‘ड्रग्ज’ नव्हे हे सिद्ध करावे लागेल, तरच तिची या प्रकरणातून सुटका होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील उज्जवल निकम यांनी व्यक्त केली.

‘एका मराठी वृत्त वाहिनीशी’ खास बातचीत करताना अॅड. उज्जवल निकम यांनी बॉलिवूड ड्रग्जप्रकरण आणि दीपिकाच्या व्हॉट्सअॅप चॅटवर प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हॉटअप चॅटिंग हा डॉक्युमेंटरी पुरावा आहे. फिर्यादीला हे सिद्ध करावे लागेल की ते ड्रग्जचे सेवन करत नव्हते. माल हे क्या? म्हणजे नेमकं काय? माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल. दीपिका पदुकोण ही ग्रुपची अडमिन होती असे देखील तपासात पुढे आले आहे. तरी तिला हे सिद्ध करावे लागेल की हे चॅटिंग ड्रग्ज संदर्भात नव्हते, असं निकम म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button