breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाळा आणि मंदिरे खुली केल्यानंतर आता सिनेमागृहे सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी

मुंबई – कोरोना संसर्ग कमी झाल्याने शाळा आणि मंदिरे खुली करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने काल घेतला. त्याचप्रमाणे आता सिनेमागृह सुरू करण्यासाठीही परवानगी दिली आहे. त्यानुसार 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह सुरु होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर शनिवारी बैठक पार पडली. याबैठकीत चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

या बैठकीत टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. दरम्यान, दिल्ली, लखनऊमध्ये सिनेमागृह सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. तसेच तत्पूर्वी शुक्रवारी राज्य सरकारने शाळा आणि मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली होणार आहेत. शाळा 4 तारखेला सुरू होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button