पिंपरी / चिंचवड

महागड्या सिगारेट नेल्याचे पैसे मागितल्याने तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी l प्रतिनिधी

टपरीमधून महागड्या सिगारेट नेल्या आणि त्याचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे टपरी मालक तरुणाने सिगारेटचे पैसे मागितले. त्यावरून सहा जणांनी मिळून टपरी मालक तरुणाला कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. तसेच दमदाटी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री खराबवाडी येथे घडली.

अभिषेक सुनील पानसरे (वय 19, रा. खराबवाडी, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 26) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय दुधांबे, त्याचे हडपसर येथील दोन मित्र, अजय हळुंदे, रोहन जगताप, गौरव कचवे, हरदिल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पान टपरी आहे. ही टपरी त्यांचा मित्र सुनील कुरटकर हा चालवतो. आरोपींनी फिर्यादी यांच्या टपरीवरून महागड्या सिगारेट घेतल्या आणि त्याचे पैसे न देता निघून गेले. हा प्रकार सुनील यांनी फिर्यादी यांना सांगितला. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींना याबाबत विचारणा करून खराबवाडी येथील जंबूकर यांच्या विहिरीजवळ बोलावले. तिथे आरोपी आले. तिथे फिर्यादिसोबत वाद घालून तलवार आणि कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. ‘आज अभिषेक याला जिवंत सोडायचे नाही. याला इथेच खल्लास करायचे असे म्हणून फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button