breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्थापत्य क्रिडा विभाग’ स्वतंत्र नसल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान – तुषार हिंगे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेंतर्गत क्रिडा विषयक सुविधा राबविण्यासाठी स्थापत्य क्रिडा विभाग हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात यावा, अशी मागणी क्रिडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी केला आहे.

यासंदर्भात हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या माध्यमातून शहरात क्रिडा विषयक सुविधा नव्याने विकसित करण्यात येतात. या सुविधा क्षेत्रीय कार्यालयनिहाय राबविल्या जातात. त्यासाठी क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचा अभिप्राय देखील घेतला जात नाही. त्यामुळे या सुविधांवर होणारा खर्च व्यर्थ जाऊन पालिकेचे नुकसान होताना दिसत आहे.

शहरात क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागाशी संबंधीत ज्या-ज्या सुविधा राबविण्यात येणार आहेत. त्या राबविण्यासाठी स्थापत्य उद्यान विभागाप्रमाणे स्थापत्य क्रिडा विभाग स्वतंत्रपणे सुरू करण्यात यावा. या विभागामार्फतच क्रिडाविषयक कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी हिंगे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button