पिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये अर्ध्या तासात दोन महिलांच्या पर्स हिसकावल्या

पिंपरी l प्रतिनिधी

चिंचवड परिसरात मंगळवारी (दि. 26) रात्री सव्वासात ते पावणे आठ वाजताच्या कालावधीत दोन अनोळखी चोरट्यांनी दोन महिलांच्या पर्स हिसकावल्या. दोन्ही घटनांमध्ये 29 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

पहिल्या प्रकरणात नीलिमा शशिकांत गावडे (वय 35, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी रात्री सव्वासात वाजता भाजी खरेदीसाठी बाहेर गेल्या होत्या. बिजलीनगर चौकात त्यांनी त्यांच्या मुलाला वडापाव खाऊ घातला आणि त्यानंतर त्या घराकडे पायी चालत जात होत्या. त्यावेळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावून नेली. पर्मध्ये मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 7 हजार 200 रुपयांचा ऐवज होता.

दुस-या प्रकरणात श्रद्धा श्रीकांत उत्पात (वय 55, रा. चिंचवड) यांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी रात्री पावणे आठ वाजता लोकमान्य हॉस्पिटल जवळ बसमधून उतरल्या आणि घराकडे पायी जात होत्या. त्यावेळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसकावली. त्यात मोबाईल फोन, रोख रक्कम, कागदपत्रे, एटीएम कार्ड असा 22 हजार 500 रुपयांचा ऐवज होता. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button