breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आंध्र प्रदेशचे उद्योगमंत्री गौतम रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हैदराबाद |टीम ऑनलाइन

काही दिवसांपूर्वीच ते दुबईत १० दिवस राहून हैदराबादला परतले होते. आंध्र प्रदेशाच्या उद्योग विभागाने राज्यात गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने दुबईतील एक्स्पोत एक स्टॉल घातला होता. त्यासाठी ते दुबईला गेले होते.

रेड्डी सोमवारी पहाटे त्यांच्या घरी पडले होते. त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. पण उपचारादम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ९.१६ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
“आज सकाळी गौतम रेड्डी यांना आपत्कालीन स्थितीत अपोलो रुग्णालयात आणण्यात आले होते. ते घरी अचानक कोसळले होते. त्यांना सकाळी ७.४५ वाजता रुग्णालयात आणण्यात आले होते. ते श्वास घेत नव्हते. ते उपचाराला प्रतिसादही देत नव्हते.”, असे रुग्णालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

गौतम रेड्डी  माजी खासदार मेकापती राजमोहन रेड्डी यांचे पुत्र आहेत. ते पहिल्यांदा नेल्लोर जिल्ह्यातील अत्माकूर मतदारसंघातून २०१४ मध्ये आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली आणि ते पहिल्या वायएसआर काँग्रेस सरकारमध्ये मंत्री बनले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री वायएसआर जगमोहन रेड्डी, तेलुगू देशम पार्टीचे प्रदेशाध्यक्ष के. अचानायडू, भाजपचे प्रदेश सरचिटणीस एस विष्णूवर्धन रेड्डी, माजी मंत्री अनम रामनारायण रेड्डी यांच्यासह अन्य नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

चंद्रावर जमीन खरेदी करता येत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका : दा.कृ. सोमण
रेड्डी यांचा जन्म ३१ डिसेंबर १९७६ रोजी नेल्लोर जिल्ह्यातील मर्रीपाडू मंडलातील ब्राह्मणपल्ली गावात झाला होता. त्यांनी ब्रिटनमधील मॅनचेस्टर विद्यापीठातून टेक्स्टाईल एमएससीमधून शिक्षण घेतले होते. त्यांच्यामागे पत्नी कीर्ति, मुलगी अन्यना रेड्डी आणि मुलगा अर्जुन रेड्डी असा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button