TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

श्रद्धा आणि आफताबमध्ये झालं होतं मोठं भांडण, पोलिसांना सापडली आफताबची ऑडिओ क्लिप

नवी दिल्लीः श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागला आहे. पोलिसांना आफताबची एक ऑडिओ क्लिप सापडली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आफताब आणि श्रद्धाचं भांडण रेकॉर्ड झालं आहे. ऑडिओ क्लिपमध्ये दोघं वाद घालत असल्याचं ऐकू येत आहे. इतकंच नाही तर आफताब श्रद्धाचा छळ कर असल्याचंही ऑडिओतून सिद्ध होत आहे.

दिल्ली पोलिसांच्या मते हा एक मोठा पुरावा ठरु शकतो. या ऑडिओ क्लिमुळे आफताबने श्रद्धाची हत्या नेमकी का केली यामागील कारण समजू शकतं असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पोलीस ऑडिओ क्लिपमधील आवाज आफताबचाच आहे का याची खात्री करण्यासाठी चाचणी करणार आहे. सीबीआयची सीएफएसएल पथक आवाजाचा नमुना घेणार आहे.

नेमकं प्रकरण काय?
वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली होती. आरोपी प्रियकर आफताब पूनावाला याने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले होते. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं.

कुटुंबीयांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत वास्तव्यास आले होते. चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांसमोर काही धक्कादायक खुलासे केले होते. मृतदेहाची विल्हेवाट लावणं कठीण असल्याने आपण त्याचे तुकडे करण्याचं ठरवलं. यासाठी आपण इंटरनेटची मदत घेतली. आपला आवडता टीव्ही शो ‘डेक्स्टर’मुळे आपल्याला मदत झाली असं त्याने सांगितलं होतं.

आफतबाने सर्वात आधी ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला होता. त्याने काही वर्षांपूर्वी शेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं. त्या कौशल्याचा फायदा त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला. कोणलाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले होते.

मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने ते सर्व फ्रीजमध्ये ठेवले होते. सोबतच डझनभर डिओड्रंट, परफ्यूम आणि सुंगंधी काड्याही भरल्या.पुढील १६ दिवस आफताब मृतदेहाची विल्हेवाट लावत होता. रोज रात्री २ वाजता तो मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरुन घराबाहेर पडत असे. रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा जंगलाच्या भागात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत असे. कचरा वेचणाऱ्यांना शंका येऊ नये यासाठी तो त्याचे आणखी छोटे तुकडे करत असे. मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसऱ्या ठिकाणी फेकून देत होता.

पोलीस आफताबपर्यंत कसे पोहोचले?
श्रद्धा घर सोडून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये आफताब आणि श्रद्धा दिल्लीत राहण्यासाठी आले होते. तेव्हापासून तिचा कोणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन बंद असल्याने तसंच सोशल मीडियावरील सर्व अकाऊंट्स बंद असल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी ६ ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

तपासात श्रद्धाचा फोन मे महिन्यापासासूनच बंद असल्याचं आढळलं. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावलं होतं. ‘ती भांडण करुन घरातून निघून गेली. पण ती कुठे गेली हे मला माहिती नाही,’ असं त्याने पोलिसांना सांगितलं. पण त्याच्या बोलण्यात वारंवार विसंगती आढळत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली असता संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी आफताबला बेड्या ठोकल्या .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button