पिंपरी / चिंचवड

बहिणीच्या पतीवर कोयत्याने वार : चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरी | प्रतिनिधी

बहिणीशी लग्न केल्याच्या कारणावरून भावाने बहिणीच्या पतिला कोयत्याने मारहाण केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीस मारहाण करत बहिणीला स्वतः सोबत नेले. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी आठ वाजता मॅक्झिन चौक, दिघी येथे घडली.

शुभम नवनाथ बरकडे (वय 22, रा. लिंब, ता. जि. सातारा) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित भोसले (वय 24), गणेश भोसले (वय 23, दोघे रा. अपशिंगे, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम, त्यांची पत्नी आणि मित्र मंगेश खंडझोडे रिक्षातून स्वारगेट येथे जात होते. ते दिघी येथील मॅक्झिन चौकात आले असता आरोपी कारमधून आले. फिर्यादी जात असलेल्या रिक्षाच्या समोर कार आडवी लावून त्यांना अडवले. त्यानंतर आरोपींनी मंगेश बरकडे याला रिक्षातून बाहेर ओढून मारहाण केली. त्यानंतर आरोपी रोहित भोसले याने त्याची बहीण ऋतुजा तिच्यासोबत फिर्यादी यांनी लग्न केल्याच्या कारणावरून त्यांना कोयत्याने मारून जखमी केले. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button