पिंपरी / चिंचवड

महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याच्या चिखलीत दोन घटना

पिंपरी | प्रतिनिधी

चिखली परिसरात मंगळसूत्र हिसकावण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दोन चोरट्यांनी दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. या घटना रविवारी (दि. 20) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास गुरुदत्त पेट्रोल पंपासमोर आणि ॲपल हॉस्पिटल समोर चिखली येथे घडल्या आहेत.

वैशाली ऋषिकेश कुलकर्णी (वय 32, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैशाली कुलकर्णी त्यांच्या पती व मुलासह दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे मिनी मंगळसूत्र हिसकावून नेले.

त्याच चोरट्यांनी अॅप्पल हॉस्पिटल चिखली येथे दुचाकीवरुन जात असलेल्या सुप्रिया साळुंखे या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे साठ हजार रुपये किमतीचे मिनी मंगळसूत्र हिसकावले. दोन्ही घटनांमध्ये एक लाख 35 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button