TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस भरती लेखी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदासाठी 19 नोव्हेंबरला पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या जिल्ह्यात लेखी परीक्षा होणार आहे. सहा जिल्ह्यांतील 444 परीक्षा केंद्रांवरील सात हजार 384 हॉलमध्ये एक लाख 89 हजार 732 उमेदवार ही परीक्षा देणार आहेत.या लेखी परीक्षेसाठी अपर पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त, 25 सहाय्यक पोलीस आयुक्त, 177 पोलीस निरीक्षक, 636 सहाय्यक पोलीस निरीक्षक / उपनिरीक्षक, 11 हजार 838 पोलीस अंमलदार असे एकूण 12 हजार 696 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त असणार आहे.

परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांसाठी काही सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत –

# प्रवेश पत्रावर नमूद केलेप्रमाणे कोव्हीड- 19 साठी खबरदारी म्हणून उमेदवारांनी परीक्षा केंद्रात दिलेल्या वेळेत प्रवेश करावा.

# उमेदवारांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करतेवेळी परिधान केलेल्या पोषाखामध्ये हाफ बाहयाचा शर्ट / टि शर्ट/टॉप परिधान करणे उचित राहील.

# परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उमेदवारांनी चप्पल/बूट/सँडल हॉल बाहेर काढावेत.

# परीक्षा केंद्रात प्रवेश करीत असताना उमेदवार यांनी त्यांच्याकडे असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे / मोबाईल स्मार्ट वॉच/ब्लुटूथ उपकरणे अशा प्रकारच्या परिक्षा केंद्रात नेण्यास प्रतिबंध आहे.

# परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याची वेळ संपल्यानंतर परिक्षा केंद्रात उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.

# कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी स्वयं घोषणापत्र / वचनपत्र स्वहस्ताक्षरात लिहून द्यावे.

# परीक्षेची पध्दत ओएमआरवर आधारीत असल्याने योग्य पर्यायाचे वर्तुळ गडद करावे.

# परीक्षेची वेळ संपल्यानंतर, पर्यवेक्षकांनी सांगितल्यानंतरच उमेदवाराने जागा सोडावी.

# उमेदवारांनी प्रवेशपत्रा बरोबरच शासनाने अदा केलेले वैध ओळखपत्र (फोटो आय. डी.) पुरावा (आधार कार्ड / पॅन कार्ड/ड्रायव्हींग लायसेन्स / मतदान ओळखपत्र/पासपोर्ट) सोबत आणावे

# उमेदवारांनी साधे निळे/काळे बॉलपॉईंट पेन आणले पाहिजेत.

# परीक्षा संपल्यानंतर सर्व उमेदवारांनी प्रवेश पत्र पर्यवेक्षकांकडे परत करावेत.

# जाहिरातीमधील महत्वाच्या सुचना व अटिंच्या अनुषंगाने उमेदवार यांनी चुकीचा निवडलेला पर्यायानुसार त्यामध्ये सुधारणा करता येणार नाही, याबाबतची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button