breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कसारा घाटात रस्ता खचला, नाशिककडे जाणारी वाहतूक संथगतीने
कसारा – मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील रस्ता खचून तडे जाण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिककडे जाणारी वाहतूक कसारा घाटातून धीम्यागतीने सुरू आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कसारा घाटातील रेल्वे व रस्ता मार्गावरील दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु असतानाच आज पहाटे जुन्या कसारा घाटातील आंबा पॉईंटच्या पुढील सुमारे 500 मीटरचा रस्ता खचला असून अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. परिणामी रस्ता खचल्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव बॅरीगेट्स लावण्यात आले आहेत. या प्रकरणी नागरिकांकरीता वाहतूक एकेरी मार्गाने चालू करण्यात आली आहे.