TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

अजय देवगणची मोठी घोषणा; अभिनयाबरोबरच ‘ही’ जबाबदारी घेणार स्वतःच्या खांद्यावर

चित्रपटसृष्टीतले कलाकार फक्त चित्रपटाच्या माध्यामातूनच पैसे कामावण्याचा काळ कधीच मागे लोटला. सध्याचे कित्येक कलाकार अभिनयाबरोबरच इतरही क्षेत्रात नशीब आजमावत असतात. रितेश देशमुखची कृत्रिम मांसाहारी पदार्थ बनवण्याचा व्यवसाय आहे, हृतिक किंवा अनुष्का शर्मासारखे कलाकार स्वतःचा ब्रॅंड काढून वेगवेगळ्या गोष्टी त्यामाध्यमातून विकत आहेत. काही कलाकार हॉटेल व्यवसायातदेखील आहेत. हळूहळू आता हा प्रकार मराठी मनोरंजनसृष्टीतही पाहायला मिळत आहे.

या सगळ्यात आता बॉलिवूडचा लाडका सिंघम म्हणजेच अजय देवगण कसा मागे राहणार. अजयने नुकतंच भागीदारीमध्ये गुजरातच्या अहमदाबाद शहरात एक मल्टीप्लेक्स थिएटर सुरू केलं आहे. याचं नाव आहे NY Cinemas. आपल्या मुलीच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरापासून अजयने या नव्या उद्योगाचा शुभारंभ केला आहे. अजयने ट्वीट करत नुकतीच याविषयी माहिती दिली आहे.

अहमदाबादच्या अमरकुंज परिसरात हे नवीन थिएटर सुरू करण्यात आलं आहे. अजयने स्पष्ट केलं आहे की अशाप्रकरच्या चित्रपटगृहाची निर्मिती करण्यामागचा केवळ एकच उद्देश आहे तो म्हणजे लोकांचा मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव आणखी भव्य करणे. या थिएटरमध्ये सर्वप्रकारच्या आधुनिक सुविधा असल्यामुळे प्रेक्षकांचा चित्रपट बघायचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.

तब्बल ३२० लोकांची क्षमता असलेलं हे थिएटर अत्याधुनिक साऊंड सिस्टिमने सज्ज आहे. शिवाय यातल्या चारही स्क्रीन्स या 3D चित्रपटासाठी योग्य आहेत. येणाऱ्या काळात फक्त अहमदाबादच नव्हे तंर सूरत आणि राजकोट या शहरातही अशाच प्रकारचं चित्रपटगृह निर्माण करण्याचा अजयचा विचार आहे. केवळ आणि केवळ चित्रपटाच्या प्रेमाखातर अजय देवगणने हा उपक्रम राबवला असल्याचं सांगितलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button