TOP Newsताज्या घडामोडीपुणे

देशातील एकूण मॉलपैकी ८ टक्के जागा पुण्यातील मॉलमध्ये भाड्याने उपलब्ध ; नाईट फ्रँकच्या अहवालातील निष्कर्ष

चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत पुण्यातील मॉलमध्ये एकूण ७.१ दशलक्ष चौरस फूट जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध असल्याची नोंद झाली. हे प्रमाण देशातील एकूण मॉल जागेच्या जवळपास ८ टक्के आहे.नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केलेल्या ‘थिंक इंडिया, थिंक रिटेल २०२२’ या अहवालातून ही माहिती समोर आली. देशातील दिल्ली, मुंबई, पुणे, हैद्राबाद, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद या आठ शहरांमधील कार्यरत २७१ मॉल्समध्ये उपलब्ध भाड्याने जागा देण्याचे क्षेत्रफळ चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये ९२.९ दशलक्ष चौरस फूट होते. तर डिसेंबर २०१९ पर्यंत देशभरातील २५५ मॉल्समध्ये ७७.४ दशलक्ष चौरस फूट जागा भाड्याने देण्यात आली होती. त्यामुळे मॉलमधील जागा भाड्याने देण्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे दिसून येते.

देशभरातील २०१७ ते २०२२ दरम्यान आठ शहरांतील शॉपिंग मॉल्समधील वापर ३ टक्क्यांनी वाढून आठ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचले. तर २०२३ मध्ये संभाव्य वापर कोविड-१९ पूर्वीची पातळी ओलांडून ११ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यताही अहवालातून वर्तवण्यात आली. पुण्यामध्ये मॉलच्या श्रेणीनुसार एकूण जागेमध्ये ब श्रेणीतील मॉल्स वाटा ५३ टक्के, अ आणि क श्रेणीतील मॉलचा वाटा अनुक्रमे १९ टक्के आणि २८ टक्के हिस्सा होता. मॉल संस्कृतीबाबत नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, ‘रिटेल स्थावर मालमत्ता क्षेत्र परिपक्वतेच्या नवीन स्तरावर पोहोचले असून, लहान आकाराच्या व अल्प श्रेणीच्या विकासांनी अ श्रेणीच्या मॉल्ससाठी मार्ग मोकळा केला आहे. सध्या मॉलच्या जागांमध्ये अ श्रेणीतील मॉलचा वाटा ९५ टक्क्यांहून अधिक असल्याने या विभागात दर्जेदार स्थावर मालमत्तेसाठी मागणी दिसून येते.’

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button