breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वाळू माफियांने शिरुरच्या महिला तहसिलदाराला धमकाविले

पुणे |महाईन्यूज|

पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना काही अज्ञात व्यक्तींकडून शुक्रवारी पहाटे धमकवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तहसीलदार लैला शेख यांच्या तक्रारीनंतर रात्री उशीरा, शिरूर पोलिसांनी अज्ञात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बेकायदा माती उत्खनन आणि वाळूउपशायावर कारवाई करण्यासाठी निघाल्या असता, शेख यांच्या सरकारी निवासस्थानी हा प्रकार घडला. त्यामुळे वाळूमाफियांना खाकी वर्दीचा धाक आहे की नाही असाच प्रश्र आता निर्माण झाला आहे. शिरुर तालुक्यात नदीपात्रात मोठया प्रमाणात अवैधरीत्या वाळूउपसा चालू आहे. शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून नदीपात्राची अक्षरशः चाळण झालेली आहे. कारवाई करुनही अवैध वाळू उपसा थांबण्याचं नाव घेत नाही.

दरम्यान, लैला शेख म्हणाल्या की, शिरूर तालुक्‍यातील नागरिकांची गैरसोय व होणारी फरफट थांबविण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक मंडलाधिकारी कार्यालय व शिरुर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी तक्रारपेटी ठेवली जाईल. या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा, सूचना व तक्रारी यांची स्वत: दखल घेतली जाणार आहे. तालुक्‍यात अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या, गैर काम करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. शिरूर तहसील इमारतीच्या स्वच्छतेबाबत योग्य ती कार्यवाही करणार आहे. जातीचे दाखले, रेशनकार्ड व इतर दाखले वेळेत मिळावे, यासाठी निवडणुकीनंतर जास्तीत जास्त लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button