breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अभिनेता संजय कपूरनंतर मुलगी शनायालाही कोरोना
मुंबई | प्रतिनिधी
अभिनेता संजय कपूर आणि त्याची पत्नी महीप यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांची मुलगी शनाया कपूर हिलाही कोरोना झाला आहे. याबाबत तिने आपल्या इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. शनायाची ४ दिवसांपूर्वीच कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र त्यानंतरही तिला शंका आल्यामुळे तिने दुसऱ्यांदा चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली.
गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीतील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता शनाया कपूरला कोरोनाची लागण झाल्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात कोरोनाची हलकी लक्षणे दिसत आहेत. मात्र प्रकृती ठीक आहे. मी घरात विलगीकरणात उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी आणि प्रकृतीची काळजी घ्यावी, असे ट्विट शनायाने केले आहे.