breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेच्या सीआयए संचालकांनी घेतली तालिबानच्या प्रमुखाची भेट?

काबूल – अमेरिकेने ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून आपले सर्व सैनिक मागे घेतले नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने दिला असतानाच अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेचे संचालक विल्यम जे. बर्न्स यांनी तालिबानचे प्रमुख नेते मुल्ला गनी बरादार यांची भेट घेतली. काबूलमध्ये त्यांची उच्चस्तरीय बैठक झाल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केले आहे. यामुळे अमेरिकेच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

१५ ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्याच्या दोन आठवडे आधी अमेरिकेने अफगाणमधील सैनिक मागे घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यांची प्रक्रियाही सुरू झाली होती. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व सैन्य मागे घेण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. त्यानुसार त्यांनी अफगाणिस्तानातील आपले सैनिक मायदेशी परत बोलवावे. अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा तालिबानचे प्रवक्ते सोहेल शाहीन यांनी दिला होता. असे असताना तालिबानचे ज्येष्ठ नेते बरादार आणि बर्न्स यांच्यात भेट झाल्याच्या वृत्ताने वेग वेगळे तर्क काढले जात आहेत. अमेरिका अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तेथील गंभीर परिस्थितीमुळे त्यात अडथळे येत आहेत. ही बचाव मोहीम सर्वात मोठी आणि अवघड असल्याचे मत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही व्यक्त केले होते. त्यानंतर सीआयएचे संचालक आणि तालिबानचे ज्येष्ठ नेते यांच्यात झालेली बैठक हा चर्चेचा विषय बनला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button