ताज्या घडामोडीपुणे

‘स्पा’च्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, चार महिलांची सुटका

पुणे | पुण्यातील उच्चभ्रू असणाऱ्या बाणेर परिसरातील एका सोसायटीमध्ये स्पा सेंटर च्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या ठिकाणाहून पोलिसांनी स्पा मालक व मॅनेजरला अटक केली आहे. तर चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. झेया स्पा मालक आणि मॅनेजर फजल अब्दुल मतीन अहमद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बाणेर येथील एका उच्चभ्रू सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली आणि मंगळवारी रात्री या ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी त्यांना त्या ठिकाणी चार महिला वेश्या व्यवसाय करत असल्याचे दिसून आले.

याप्रकरणी पोलीस हवालदार मनीषा पोकळे यांनी चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे तर चार पीडित महिलांची सुटका करून त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button