breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

मुंबई – भाजपा नेत्या आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना शनिवारी उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले. प्रज्ञासिंह ठाकूर यांना रक्तदाबाचा आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मध्य प्रदेशमधून एअरलिफ्ट करुन त्यांना मुंबईत अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, प्रज्ञासिंह ठाकूर यांना एका महिन्यात रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे. १ फेब्रुवारीला त्यांना अशाच मुद्द्यांसाठी नवी दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थान (एम्स) येथे नेण्यात आले होते. तर यापूर्वी कोविड १९ची लक्षणे दिसू लागल्यानंतर डिसेंबर २०२०मध्ये त्यांना एम्समध्ये दाखल केले गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशमध्ये प्रचंड सक्रीय होत्या. पक्षाच्या वेगवेगळ्या पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत तसेच स्थानिक प्रशासनासोबत त्यांच्या सतत बैठका सुरू होत्या. पाच मार्च रोजी त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवला. हा त्रास होत असूनही औषधे घेऊन त्यांनी कामकाज सुरू ठेवले. त्यानंतर शनिवारी मतदारसंघातील दिशा समितीच्या सदस्यांसोबत जिल्हा पंचायत कार्यालयात त्यांना एक बैठक घ्यायची होती. मात्र या बैठकीआधीच रक्तदाबासह श्वसनाचाही त्रास जाणवू लागल्यामुळे प्रज्ञासिंह ठाकूर यांना काम करणे कठीण झाले. त्यानंतर तातडीने त्यांना मध्य प्रदेशमधून एअरलिफ्ट करुन मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button