breaking-newsTOP Newsराष्ट्रिय

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आजपासून सुरू

अमेरिका आणि फ्रान्सबरोबर केलेल्या द्विपक्षीय करारामुळे हिंदुस्थानातून या दोन देशांत विमान वाहतूक सुरू होणार आहे. शुक्रवारपासून देशातील विमान कंपन्यांना या दोन देशांत आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालविण्यास परवानगी मिळणार, असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली.

एअर फ्रान्स कंपनीची 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत 28 विमाने दिल्ली, मुंबई, बंगळुर आणि पॅरिस दरम्यान उड्डण करतील. एअरलाईन्स युनायटेड ही कंपनी हिंदुस्थान आणि अमेरिके दरम्यान 17 जुलै ते 31 जुलै दरम्यान 18 उड्डाणे चालविणार असल्याची माहिती पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जर्मनी आणि यूके दरम्यानही अशीच व्यवस्था केली जात आहे. त्याचबरोबर दररोज दिल्ली ते नेवार्क आणि दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को दरम्यान आठवडाभरात विमान सेवा सुरू होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button