breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे मायोका चे आयोजन

मुंबई | प्रतिनिधी 

येत्या १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा ८१ वा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे सुद्धा एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मायोका अर्थात महाराष्ट्र युथ कार्निवल असे या उपक्रमाचे नाव असून या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि मुंबई शहरात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उपक्रमाची माहिती देताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले की ज्याप्रकारे आदरणीय साहेबांनी सामान्य घटकाला कायमच केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा विकास केला.
समाजाभिमुख धोरणे आमलात आणली. त्याच विचारांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सबंध महाराष्ट्रातील ग्रामीण भागात, छोट्या छोट्या शहरात प्रचंड गुणवान व कला-कौशल्य असलेले असंख्य विद्यार्थी व युवक आहेत. या सर्वांच्या गुणवत्तेला, त्यांच्याकडे असलेल्या कलेला, प्रत्येकवेळी व्यासपीठ मिळेलच असे नाही. त्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने अशा सर्व युवक, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी सबंध महाराष्ट्रभर ‘Maharashtrata Youth Carnival’ अर्थात MAYOCA या युथ फेस्टिवल चे आयोजन केले जाणार आहे.

या फेस्टिवल अंतर्गत वैयक्तिक गायन, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, चित्रकला, मॉडेलिंग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई सह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्यक्ष निवड चाचणी होणार असून निवड झालेल्या स्पर्धकांना विभाग स्तरावरील उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. अंतिम फेरी मुंबई येथे होणार असून या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील विविध विभागातील विविध स्तरावरील विजेत्या स्पर्धकांना एकूण तब्बल २५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेची नोंदणी १२ डिसेंबर पासून सुरू होत असून संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

या माध्यमातून महाराष्ट्राच्या गाव खेड्यातील आणि छोट्या शहरातील, जगासमोर न आलेल्या गुणवान कलाकारांना प्रोत्साहन मिळणार आहे. २५ डिसेंबर नंतर जिल्ह्यात/ शहरात या स्पर्धेची निवड चाचणी होणार आहे. जिल्हास्तरावरील निवडचाचणी मध्ये निवडलेल्या स्पर्धकांना विभागीय उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार असून त्यामधून राज्यपातळीवर स्पर्धेत प्रवेश मिळेल.
विद्यार्थी व युवकांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करीत आहे.

स्पर्धेची संपूर्ण माहिती व तपशील www.nscmayoca.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button