breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘माझी छाती फाडून बघितली तर त्यात विखे पाटील दिसतील’; अब्दुल सत्तार

विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं व्हावं

मुंबई : राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आहेत. तर नागपुरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील मुख्यमंत्री म्हणुन पोस्टर्स लागले आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं नावंही मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत विचारले असता ते म्हणाले की, मित्र मोठा व्हावा असं कोणाला वाटत नाही? विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं व्हावं. मी जर हनुमानासारखा मोठा भक्त असतो, तर माझी छाती फाडून दाखवलं असतं की माझ्या हृदयात विखे पाटीलच आहेत.

मी ही अनेक दिवसांपासून राजकारण करतो आहे. राधाकृष्ण विखे पाटील मराठा नेते आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा मराठा नेते आहेत. आमचे मार्गदर्शक सुद्धा मराठे आहेत. हे लोकप्रिय मराठे नेते माझ्या हृदयात आहेत. कोणाला वाटणार नाही, आपल्या मित्र काही तरी व्हावं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पुढे जाऊन यावे. मात्र, ते अडचणीत येतील असे प्रश्न विचारू नका, असंही सत्तार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button