कळत नकळत कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मानाने माफ करा
कुंदन गायकवाड यांचे प्रभाग समितीच्या शेवटच्या सभेत भावनिक आवाहन
पिंपरी l प्रतिनिधी
‘माझ्याकडून कधी कुणाला जिव्हारी लागेल असा एखादा शब्द गेला असेल व कळत न कळत कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मोठ्या मनाने आपण माफ करा, अशी भावनिक साद फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी घातली.
नगरसेवकांचा 12 मार्च रोजी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. 3 मार्च रोजी फ प्रभाग समितीची अखेरची सभा संपन्न झाली.या प्रसंगी बोलताना फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी अधिकारी पदाधिकारी यांचे भावनिक ऋण व्यक्त केले.
पाच वर्षात अनेक विकासकामे मार्गी लावताना नागरिकांना अपेक्षित असणारी कामे पूर्ण करणे व त्यासाठी वेळप्रसंगी अधिकारी वर्गाशी तू-तू मैं-मैं होण्याचे प्रसंग सर्वत्र घडत असतात. मात्र सहसा कुणीही मनाचे मोठेपण दाखवत नाही. याउलट प्रत्यय पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात आलेला दिसला. फ प्रभाग अध्यक्ष व नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी आपण आजवर अनेक विकासकामे करण्यासाठी सहकार्य केले. यापुढेही आपण सहकार्य करावे अशी विनंती देखील गायकवाड यांनी केली आहे.
सोनवणे वस्ती, शेलार वस्ती, सुखकर्ता कॉलनी, राजगड पार्क, पाटील नगर येथील डांबरीकरण व पेव्हिंग ब्लॉक संदर्भात प्रश्न मांडून ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी चर्चा अधिका-यांशी केली. यावेळी सहकारी नगरसेविका साधना मळेकर, स्विनल म्हेत्रे, संगीता ताम्हाणे, कमल घोलप, सुमन पवळे, सचिन चिखले, उत्तम केंदळे, संतोष मोरे व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.