पिंपरी / चिंचवड

अल्पवयीन मुलीला तिचा नग्न व्हिडीओ पाठवण्याची मागणी करत विनयभंग

पिंपरी l प्रतिनिधी
पोलीस असल्याची बतावणी करून एका तरुणाने अल्पवयीन मुलीला तिचा नग्न व्हिडीओ सोशल मीडियावर पाठवण्याची मागणी केली. त्यापूर्वी एका अल्पवयीन मुलाने पीडित मुलीला धमकी देऊन तिचा नग्न व्हिडीओ दुस-या अल्पवयीन मुलाच्या सोशल मीडियावर पाठवण्यास सांगितले. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते चार वाजताच्या कालावधीत किवळे परिसरात घडला.

ज्ञानेश्वर शिवाजी जाधव (वय 22, रा. भोंडाले, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांच्या 13 वर्षीय मुलीला ‘तुझ्या बहिणीला उचलून नेईन’ अशी धमकी दिली. बळजबरीने मुलीला तिचा नग्न व्हिडीओ बनवायला लावून तो व्हिडीओ दुस-या अल्पवयीन मुलाच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवण्यास सांगितले. दोघांनी याबाबत आरोपी ज्ञानेश्वर याला सांगितले. ज्ञानेश्वर याने देखील पीडित मुलीला फोन करून अश्लील चॅटिंग केले. तसेच ज्ञानेश्वर याने पोलीस असल्याची बतावणी करून नग्न व्हिडीओ पाठ्वण्याबाबत पीडित मुलीला वेळोवेळी चॅटिंग व फोन करून मुलीला पाठलाग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button