breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काँग्रेसकडील विधानसभा इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती

पिंपरी, (महाईन्यूज)- विधानसभा निवडणुका तीन महिण्यात होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते.

पक्षाकडे प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली असून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी (दि. 30) सकाळी 11 वाजता पुण्यातील काँग्रेस भवन येथे होणार आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी कळविली आहे.

या मुलाखती माजी मंत्री जयवंतराव आवळे, महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा आणि काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे घेणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button