ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

दामोदर नाट्यगृह प्रकरणी मनसे आक्रमक

मुंबई महानगरपालिकेवर पैसे ओरबाडण्याचा डाव

मुंबई : मुंबईतील रंगभूमीच्या इतिहासाची साक्ष देणारे दामोदर नाट्यगृहाच्या पाडकामाला सुरुवात झाल्याचे बुधवारी २२ मे रोजी समोर आले होते. याठिकाणी खासगी शाळा उभारण्यात येणार आहे. नाट्यकर्मींचा या गोष्टीला विरोध आहे. परळ याठिकाणी असणाऱ्या दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी होणार असे याआधी समोर आले होते. या एकंदरित प्रकरणात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी हे नाट्यगृह वाचवण्यासाठी नाट्यकर्मी प्रशांत दामले यांनी संपाचा इशाराही दिला होता. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांची एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत मनसेची भूमिका मांडली.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल सर्व्हिस लीककडून करण्यात येणाऱ्या या पुनर्विकासाला विरोध दर्शवला. त्यांनी असे ट्वीट केले आहे की, ‘गिरणगावातील दामोदर नाट्यगृह नूतनीकरणासाठी बंद आहे असा समज होता, पण खरं कारण आता लक्षात आलेलं आहे. ऐतिहासिक असं हे नाट्यगृह जमीनदोस्त करुन तिथे सीबीएसई शाळा उभारण्याचा महापालिकेचा मनसुबा आहे. हा मनसुबा कधीच यशस्वी होऊ देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शब्द आहे.’

नाट्यगृह आहे त्याच ठिकाणी उभं राहणार असं स्पष्ट करत खोपकर पुढे लिहितात की, ‘नाट्यगृहाचं आरक्षण हटवून शाळेच्या नावाखाली पैसे ओरबाडण्याचा महापालिकेचा कुटील डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही. कामगार चळवळीचं साक्षीदार असलेलं हे दामोदर नाट्यगृह तेवढ्याच दिमाखात उभं राहणारंच!’

दरम्यान याआधी दामोदर नाट्यगृह ट्रस्टचे सचिव प्रकाश कोंडूरकर यांनी असे म्हटलेले की, नाट्यगृहाच्या इमारतीचं पाडकाम करुन त्याठिकाणी शाळेची इमारत उभारली जाईल. त्यांनी अशीही माहिती दिलेली की त्याच परिसरात असणाऱ्या सोशल सर्व्हिस लीग शाळेत ३००० विद्यार्थी शिकतात, शाळेची इमारत पाडून तिथेच शाळेची इमारत बांधल्यास विद्यार्थी शिकणार कुठे? या कारणास्तर नाट्यगृहाची इमारत पाडून तिथे शाळेची इमारत बांधली जाईल, असं कोंडूरकर म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button