पिंपरी / चिंचवड

फोन आणि सोशल मीडियावरून तरुणीचा पाठलाग

पिंपरी l प्रतिनिधी

फोन करण्यास मनाई केली असताना देखील तरुणाने तरुणीला वारंवार फोन केला. तरुणीने नंबर ब्लॉक केला असता सोशल मीडियावर मेसेज आणि व्हिडीओ कॉल करून पाठलाग केला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही घटना 7 मार्च पूर्वी 15 दिवसांपासून वडमुखवाडी येथे घडली.

अविनाश बाळू हरिभक्त (वय 22, रा. वडमुखवाडी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने आरोपीला फोन करू नको, असे सांगितले होते. तरीही त्याने तरुणीला वारंवार फोन करून तिचा पाठलाग केला. त्यामुळे तरुणीने तरुणाचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर तरुणाने तरुणीला सोशल मीडियावरून वारंवार मेसेज आणि व्हिडीओ कॉल करून तिचा पाठलाग केला. फिर्यादी तरुणीच्या आईला आरोपी तरुणाने शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button