breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची बदली, त्यांच्या जागी मंगेश शिंदे यांची नियुक्ती

पिंपरी – पुणे शहर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याजागी मंगेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राज्य सरकारच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि. 27 जुलै) काढलेल्या आदेशान्वये (शासन आदेश क्रमांक : रापोसे-1718/प्र.क.196/पोल 1 (अ)) भारतीय पोलीस सेवा, राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील 95 अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची पोलीस उपायुक्त, मुंबई शहर येथे बदली करण्यात आली.

 

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम यांनी पदभार स्वीकारताच आयुक्तालय क्षेत्रातील 11 अधिका-यांच्या आयुक्तालय अंतर्गत बदल्या केल्या. त्यामध्ये मंगेश शिंदे यांची परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button