breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

#COVID19: भारत इलेक्ट्रॉनिक्ससह वाहन उत्पादन कंपन्या वेंटिलेटर निर्मिती करणार!

नवी दिल्ली। महाईन्यूज । टीम ऑनलाईन

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. कंपनी आता वेंटिलेटर तयार करणार आहे. तसेच, देशातील सर्व औषध कंपन्यांनी सरकारला आश्वासन दिले आहे की, या संकटाच्या वेळी औषधांची कमतरता भासणार नाही.

विशेष म्हणजे, वाहन उत्पादकदेखील व्हेंटिलेटर विकसित आणि उत्पादन करण्याचे काम करीत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिली.

तसेच, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ‘मल्टी-पेशंट व्हेंटिलेटर’ विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्यामध्ये कोविड -१९ चा उद्रेक नियंत्रणाबाहेर गेला, तर अनेक रुग्णांना एकाच वेंटिलेटरने उपचार दिला जावू शकतो.

आगामी आठवडाभरात अशी वेंटिलेटर उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. पहिल्या महिन्यात सुमारे ५हजार व्हेंटिलेटर तयार होतील आणि त्यानंतर १०,००० वेंटिलेटर तयार केले जातील, अशी माहिती डीआरडीओच्या सूत्रांनी दिली.

वाहन उत्पादक कंपन्यांची महत्त्वपूर्ण बैठक :

मारुती, टाटा, महिंद्रा आणि महिंद्रा इत्यादी ऑटोमोबाईल उत्पादक व्हेंटिलेटरच्या उत्पादनात गुंतले आहेत. ते आरोग्य मंत्रालयाशी चर्चेत आहेत आणि त्यांनी बैठक घेतल्या आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अधिकारी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button