TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस बांधावर पोहोचताच शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला; भावूक होत मुख्यमंत्र्यांनी धीर दिला

लातूरमध्ये दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी; ‘तुम्ही आमचे भाऊ आहात’ म्हणत महिलांनीही मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा

लातूर : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी थेट बांधावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधत पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने पिकांची अवस्था आणि संकटाची व्यथा सांगताना भावूक होत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा प्रसंग पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्याला जवळ घेत धीर दिला.

दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. पावसाअभावी पिके करपली असून, आगामी हंगामाबाबतही चिंता असल्याचे शेतकऱ्यांनी मांडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बांधावरच शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली.

यावेळी काही महिलांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ‘तुम्ही आमचे भाऊ आहात,’ असे म्हणत त्यांनी आपल्या अडचणी आणि अपेक्षा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या संवादादरम्यान उपस्थितांमध्ये भावूक वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा –  PCMC : ‘‘वायसीएम’’ रुग्णालयात औषधांचा तुटवडा; रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्याची वेळ!

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, केंद्राच्या मदतीसाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्याची तयारीही सुरू आहे. केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.

लातूर आणि धाराशिव परिसरात पावसाची कमतरता, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे. लातूरमधील मांजरा धरणातील पाणीसाठाही अत्यल्प पातळीवर पोहोचला असून, आगामी काळातील पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचे आव्हान निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा प्रत्यक्ष शेतशिवारातील पाहणी दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पीक नुकसान, शेतकऱ्यांना मदत, पाणीपुरवठा आणि आगामी हंगामासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सरकारकडून पुढील निर्णयांकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button