Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिघांना राजस्थानमधून अटक; पोलिसांची धडक कारवाई

मुंबई | बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी झालेल्या जीवघेण्या गोळीबार प्रकरणातील तिन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील कोटा येथून या तिघांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघे हरियाणाचे तर एकजण बिहारचा रहिवासी आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल १५ विशेष पथके तयार केली होती.

जुहू येथील पुष्पा नरसी पार्कजवळ रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास टायगर श्रॉफच्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुदैवाने बालंबाल बचावला. मात्र, त्याचा चालक फिरदोश आणि उमेश चव्हाण नावाचा एक निष्पाप पादचारी गोळीबारात जखमी झाले आहेत. पोलिसांनी तातडीने जखमी चालकाचा जबाब नोंदवून घेतला आहे.

हेही वाचा

हार्दिकचा पर्याय शोधणे थांबवा; फलंदाजीच्या नादात गोलंदाजीशी तडजोड नको: सुनील गावस्कर

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९(१), ३(५) आणि शस्त्र कायद्याच्या (Arms Act) कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच) यांच्याकडून संयुक्तपणे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगचा दावा; पोलीस तपास सुरू

दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पोलीस या सोशल मीडिया पोस्टची बारकाईने चौकशी करत आहेत. तथापि, पोलिसांनी अद्याप या दाव्याला अधिकृत पुष्टी दिलेली नसून, आरोपींचा बिश्नोई गँगशी थेट संबंध आहे किंवा नाही, याबाबत अधिक तपास केला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button