TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“फडणवीस-शिंदेंनाच का टार्गेट करताय?”; मनोज जरांगेंना आशिष शेलारांचा थेट सवाल

“महायुतीने मराठा समाजासाठी प्रत्यक्ष निर्णय घेतले; सणासुदीत मुंबईला येऊ नये”, शेलार यांचे आवाहन

मुंबई : “महायुती सरकारने नेहमीच मराठा समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. आमच्या सरकारने केवळ बोलघेवडेपणा केला नाही. आधीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाचे आरक्षण टिकवता आले नाही, मग आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाच का टार्गेट केले जात आहे?” असा सवाल मंत्री आशिष शेलार यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना केला.

१६ सप्टेंबर रोजी माध्यमांशी बोलताना शेलार यांनी महायुती सरकारच्या मराठा समाजासंदर्भातील निर्णयांचा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय याकडे त्यांनी लक्ष वेधले. महायुती सरकारने मराठा समाजासाठी प्रत्यक्ष काम केले असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारने बहुतांश मागण्या मान्य करून त्यावर कार्यवाही केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, १३ मागण्यांपैकी १२ मागण्या मान्य करण्यात आल्या असून उर्वरित मागणी न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर तत्काळ निर्णय घेता येणार नाही.

हेही वाचा –  दिघी आणि चऱ्होली-चोविसावाडी येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्प रद्द करा..!

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असतानाही जरांगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांचे मुंबईत १९ सप्टेंबरला पोहोचण्याचे नियोजन असल्याचे वृत्त आहे.

याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी सणासुदीच्या काळात मनोज जरांगे यांनी मुंबईला येऊ नये, असे आवाहन केले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुण्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याने उत्सवात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर काही अडचणी असतील, तर त्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल,” अशी ग्वाहीही शेलार यांनी दिली. गणेशोत्सवाच्या काळात आंदोलनामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, अशी भूमिका सरकारकडून यापूर्वीही मांडण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button