ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जलतरण तलावाच्या दुरुस्तीला गती!

माजी महापौर तथा नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

– स्वच्छतागृह, हॉल व परिसराच्या स्वच्छतेसह बेबी स्विमिंग पूल सुरू करण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जलतरण तलावाच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर तथा नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनी जलतरण तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून लिकेजची समस्या तातडीने दूर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जलतरण तलावामध्ये निर्माण झालेल्या लिकेजच्या समस्येमुळे हा तलाव काही काळ बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे नियमित जलतरण करणारे नागरिक, खेळाडू, विद्यार्थी आणि परिसरातील लहान मुलांची मोठी गैरसोय होत होती. या समस्येची दखल घेत डॉ. वैशाली घोडेकर यांनी तलावाला भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

लिकेज नेमके कोणत्या ठिकाणी होत आहे, हे शोधण्यासाठी तलावामध्ये पाणी भरून प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी तलावाच्या विविध भागांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीच्या कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. लिकेजची समस्या कायमस्वरूपी दूर होईल, अशा पद्धतीने तांत्रिक आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याचे स्पष्ट निर्देश डॉ. घोडेकर यांनी दिले.

हेही वाचा – ‘ओबीसींचे आरक्षण संपले’; मनोज जरांगे आणि सरकारवर लक्ष्मण हाकेंचा घणाघात

तलावाच्या दुरुस्तीपुरते काम मर्यादित न ठेवता संपूर्ण परिसरातील सुविधांमध्ये सुधारणा करण्यावरही त्यांनी भर दिला. जलतरण तलावाजवळील स्वच्छतागृहे, हॉल आणि आजूबाजूच्या परिसराची तातडीने स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी असलेला बेबी स्विमिंग पूल आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षिततेची तपासणी करून लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तलाव परिसरातील उर्वरित दुरुस्तीच्या कामांची माहिती घेऊन ती सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही डॉ. घोडेकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जलतरण तलावाचा नेहरूनगरसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर वापर करतात. विद्यार्थी आणि खेळाडूंच्या जलतरण प्रशिक्षणासह नागरिकांच्या आरोग्य आणि व्यायामासाठी हा तलाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करून तलाव पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याची मागणी होत होती. डॉ. वैशाली घोडेकर यांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे आता या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

नेहरुनगर नागरिकांना जलतरण तलावासह परिसरातील सर्व सुविधांचा सुरक्षित आणि सुरळीतपणे वापर करता यावा, यासाठी आवश्यक ती संपूर्ण कार्यवाही केली जाणार आहे. दुरुस्ती आणि स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. वैशाली घोडेकर यांनी स्पष्ट केले. “जलतरण तलावातील लिकेजची समस्या तातडीने आणि कायमस्वरूपी दूर करण्यात यावी. तलावासह स्वच्छतागृहे, हॉल आणि संपूर्ण परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवावा. बेबी स्विमिंग पूलही आवश्यक कामे पूर्ण करून लवकर सुरू करावा. नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सर्व कामांचा नियमित पाठपुरावा करण्यात येईल.”

— डॉ. वैशाली घोडेकर, माजी महापौर तथा नगरसेविका, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button