ताज्या घडामोडीपुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘रिअल हिरोज’ पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार!

चिखली-मोशी गृहनिर्माण महासंघाचा उपक्रम; पोलिसांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

पिंपरी-चिंचवड | नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निःस्वार्थ सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ मर्यादित (शाखा : चिखली-मोशी) यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी चिखली, एमआयडीसी भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्यांसह संबंधित उपायुक्त (DCP) कार्यालयाला भेट देत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘रिअल हिरोज’ म्हणून सन्मान केला. नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल अहोरात्र कार्यरत असते. त्यांच्या या सेवेला सलाम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

स्वातंत्र्यदिन हा केवळ राष्ट्रध्वजवंदन आणि देशभक्तीपर कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा व्हावा, या भावनेतून महासंघाने हा उपक्रम आयोजित केला. पोलिसांच्या कार्याबद्दल नागरिकांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

हेही वाचा

प्रस्तावित गार्डन वाचविण्यासाठी Gen Alpha मैदानात; ‘We Want Garden’च्या घोषणांनी वाकड दणाणले!

या उपक्रमासाठी महासंघाचे पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुहास पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले. चिखली-मोशी शाखेच्या कार्यकारिणी कमिटीचे सदस्य आशिष सातकर, विजय महाजन, ॲड. नितीन शिला, लक्ष्मण इंदोरे, विनायक जगताप, आशा वाबळे, सुभाष गारगोटे, राजेंद्र माने, डॉ. विनोद भेलोसे, स्वप्निल झांबरे, राहुल मोकाशी, राजेंद्र शिंदे आणि डॉ. माणिक गवळी यांची यावेळी उपस्थिती होती.

पोलीस प्रशासनाकडून महासंघाच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत झाल्यास परिसरातील सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करणाऱ्या या उपक्रमाचे चिखली-मोशी परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button