राज्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत शनिवारपर्यंत पहिली अधिसूचना; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई | राज्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हालचाली तीव्र केल्या आहेत. दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात येत्या शनिवारपर्यंत पहिली अधिकृत अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “प्राथमिक डेटा गोळा करण्यात आली आहे. त्याआधारावर दुष्काळ संदर्भातील पहिली अधिसूचना शनिवारपूर्वी काढणार आहोत. आपल्याकडे असलेल्या माहिती आणि आकडेवारीवर आधारित कुठे दुष्काळ आणि त्याच्या उपाययोजना काय याबाबत अधिसूचना असेल. त्यानंतरही त्यामध्ये हा डेटा येतच राहणार आहे. एखादा भाग सुटला तर त्यामध्ये समाविष्ट करता येईल.”
हेही वाचा
PCMC: नागरिकांच्या सूचनेवर तातडीची कृती; प्रभाग क्र. ८ मध्ये विकासकामांना वेग!
“तत्काळ उद्यापासून फिल्डवर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून आपल्याला जी काही मदत करावी लागते, त्याकरता केंद्र सराकराची मदत घ्यावी लागते या दोन्ही करता नियमानुसार प्रस्ताव तयार करण्यासाठी फिल्डवरची माहिती गोळा करावी लागते. साधारणपणे बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती दिसते आहे, पिकं करपली आहेत. विषेशतः सोबायीन, मका, कापूस, यावर सर्वाधिक परिणाम झालेला दिसतोय. कोकणातही भातावर परिणाम झाला आहे. ज्वारीवरही परिणाम झाला आहे. तसंच पाण्याचं नियोजनही करावं लागणार आहे”, असं फडणवीस म्हणाले.
“दु्ष्काळी परिस्थितीत अनेक निर्णय घ्यावे लागतील, म्हणून फिल्डवरच्या परिस्थिती अनुरूप सातत्याने निर्णय घ्यावे लागणार आहेत, त्याकरता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती बैठक घेऊन फिल्डवरच्या रिपोर्टचा आढाव घेईल, सूचना देईल, तक्रारी दूर करण्याचं काम करेल. यावर माझं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष असेल. ही समिती कॅबिनेटची उपसमिती असेल. या समितीला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत”, अशी माहितीही फडणवीसांनी दिली.





