breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

लक्ष्मण जगतापांच्या पत्नी पाठोपाठ बंधू शंकर जगतापांनी घेतला उमेदवारी अर्ज

भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा नाही

चिंचवड : भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकतेच निधन झाले असून चिंचवड पोटनिवडणूक लागली आहे. अद्याप भाजपाकडून किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांनी आज ग प्रभाग येथून उमेदवारी अर्ज विकत घेतला. यांच्या पाठोपाठ आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. दोघांचीही नावे उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. मात्र भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील बंधू शंकर जगताप आणि पत्नी आश्विनी जगताप यांनी आज उमेदवारी उर्ज घेतला आहे. मात्र, भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे भाजपकडून दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे राहणं महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, चिंचवड पोटनिवडणूकीत जगताप कुटुंबीयांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असून राहुल कलाटे यांचा एक लाख मतांनी पराभव करायचा आहे. हीच खरी श्रद्धांजली दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना असेल असे आवाहन भाजपा पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. अद्याप महाविकास आघाडी कडून निवडणूकीच्या रिंगणात कोण उतरणार हे स्पष्ट झालेले नाही. परंतु, राहुल कलाटे हेच विरोधक उमेदवार असणार असल्याचा अंदाज भाजपाने व्यक्त केला असून त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button